आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्तारोको

By Admin | Updated: August 14, 2014 23:48 IST2014-08-14T23:43:21+5:302014-08-14T23:48:27+5:30

बुलडाणा जिल्ह्यात ६१८ आंदोलनकर्ते स्थानबद्ध

Reservation of Dhangar community for reservation | आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्तारोको

आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्तारोको

बुलडाणा : राज्य घटनेमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिले असताना महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या समाजाला आपल्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले. घटनेने दिलेला अनुसूचित जातीच्या सवलतीचा अधिकार विनाविलंब धनगर समाजाला देण्यात यावा, या मागणीसाठी धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने आज जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये ६१८ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. बुलडाणा येथे चिखली मार्गावर रामभाऊ जुमडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आले.
शेगाव : येथे यशवंतदादा बुरुंगले यांच्या नेतृत्वाखाली शेगाव-आकोट रोडवर रास्तारोको करण्यात आला. यावेळी अशोक देवकते, केशव हजारे, संतोष पिंगळे, मंगेश करे, जनदीन बोरसे, उत्तम बोरसे, रामरतन पटोकार, महादेव पालवे, राजेंद्र गोरे, चंद्रकांत माने, संतोष माने, रवि काळे, मनोज माने, मधुकर मासाळ, नामदेव माने, हनुमान बुरुंगले, काका सोलनकर यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
चिखली : चिखली येथील जिल्हा सहकारी बँकेजवळील चौकात जिल्हाध्यक्ष विजय खरात यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, विजय खरात, संजय पांढरे, दिलीप गवारे, रमेश देढे, भानुदास गवारे, गजानन कळंगे, आकाश गवारे आदी समाजबांधवांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
मेहकर : येथील मुख्य महामार्गावर धनगर समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये संदीप गायकवाड, विजेंद्र पाझडे, प्रल्हाद गोरे, एकनाथ खराट, पप्पु गायकवाड, पांडुरंग घाटोळ, गजानन कातडे, योगेश फुके, गजानन पातळे, रामप्रसाद खोडवे, सुरेश औदगे, दत्तात्रय खराट, संतोष गोरे, वैभव नव्हाळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
मोताळा : येथील मुख्य मार्गावर धनगर सामाज बांधवांनी रास्तारोको केले. या आंदोलनात पारंपरिक पोशाखासह शेकडो महिला व पुरूष मुलाबाळांसह सहभागी झाले होते. जिल्हा अध्यक्ष रामेश्‍वर काळंगे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाले. यावेळी हरिभाऊ कर्नर, नानाभाऊ शिंदे, काशीराम बिचकुले, रामा शिंगाडे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.
मलकापूर : येथील सोलापूर-मलकापूर या राज्य महामार्गावर व तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात अनिल पाचपोळ, चंद्रकांत कवळे, मधुकर फासे, विनय काळे, निनाजी बोरसे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.
संग्रामपूर : येथील वरवट बकाल बसथांब्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यात ३५ जणांना तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, एक तास वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात चंदाताई पुंडे, भारत वाघ, रमेश इलामे सहभागी झाले होते.

Web Title: Reservation of Dhangar community for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.