शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या ‘मातृवंदन’ योजनेसाठी १५0 दिवसांत नोंदणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:59 AM

बुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे. 

ठळक मुद्देसोमवारपासून अंमलबजावणी ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत लाभ

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे. दुसरीकडे  जिल्ह्यात मानवविकास कार्यक्रमांतर्गत सात तालुक्यात गर्भवती महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनाही जिल्ह्यात सुरू आहे. या योजनेंतर्गत लाभ घेणार्‍या गर्भवतींनाही ‘मातृवंदन’ योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात अजूनही माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी झालेले नाही. विशेषत: ग्रामीण भागामध्ये वर्षाकाठी १00 पेक्षा अधिक बालमृत्यू होतात. या पृष्ठभूमीवर मातृवंदन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे; मात्र या योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलेस १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २0१८ पासून होणार असून, त्याचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत देण्यात येणार आहे.गर्भवती महिलांना मदत करण्याकरिता १ जानेवारी २0१८ पासून मातृवंदन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महिलांना तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान केंद्र शासनातर्फे देण्यात येईल. योजनेचा लाभ नोकरदार महिला सोडून सर्व गटातील महिलांना मिळेल; मात्र याव्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थींना पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येईल. रक्कम लाभार्थींच्या बँक खाते, पोस्ट खात्यावर जमा  होईल. आरोग्य केंद्राचे लसीकरण कार्ड असणे आवश्यक आहे.

३४८ आरोग्य केंद्रांतर्गत अंमलबजावणीगर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत मिळणार आहे. यासाठी सदर महिलेने आपल्या परिसरातील आरोग्य केंद्रावर आरोग्यसेविका, आशा तसेच अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीने गर्भवती झाल्यापासून १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यात येणार्‍या आरोग्य केंद्रामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र २८0 आरोग्य उपकेंद्र, १२ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालय तसेच एक जिल्हा सामान्य रुग्णालय असे ३४८ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

तीन टप्प्यात लाभगर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ तीन टप्प्यात मिळणार आहे.  नोंदणी झाल्यानंतर सदर महिलेस पहिल्या टप्प्यातील एक हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिने पूर्ण झाल्यावर दुसर्‍या टप्प्यातील दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यावेळी गर्भवती महिलेची तपासणी करण्यात येईल, तर प्रसूतीनंतर बालकाची जन्म नोंद केल्यानंतर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसर्‍या टप्प्यातील दोन हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाnew born babyनवजात अर्भक