शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा ईव्हीएम घोटाळ्याबाबत निवेदन करा!

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 02:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बुलडाणा येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या इव्हीएम घोटाळ्याबाबत सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले.काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी इव्हीएम घोटाळ्याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र, विषयाचे गांभीर्य लक्षात घेत दत्त यांना या विषयावर बोलण्याची परवानगी ...

ठळक मुद्देसभापतींचे सरकारला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बुलडाणा येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या इव्हीएम घोटाळ्याबाबत सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले.काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी इव्हीएम घोटाळ्याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र, विषयाचे गांभीर्य लक्षात घेत दत्त यांना या विषयावर बोलण्याची परवानगी दिली. इव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करताना दत्त म्हणाले, बुलडाणा जिल्हा परिषदेतील बुथ क्रमांक ५६, सुलतानपूर येथे फेब्रुवारी २०१७ साली मतदान झाले. इथल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आशा जोरे यांचे नारळ हे निवडणूक चिन्ह होते. येथील निवडणुकीबाबत जोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. बुलढाणा येथील प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीही इव्हीएम घोटाळा झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोकाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, आयोगाने त्या तक्रारींची दखल घेतली नाही. बुलढाणा येथील तपासाने इव्हीएम घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दत्त म्हणाले. संजय दत्त यांच्या स्थगन प्रस्तावाची दखल घेत सभापती निंबाळकर यांनी राज्य सरकारला या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश दिले.अपक्ष उमेदवाराचे मत जात होते भाजपला!निवडणूक अधिका-यांनी तपासणी केली असता नारळ या चिन्हासमोरील बटण दाबले असता भाजपा उमेदवाराला मत जात असल्याचे दिसून आले. तसा अहवाल बुलडाणाचे जिल्हाधिकारी डॉ. विजया झाडे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. या अहवालाने इव्हीएम घोटाळा होवू शकतो हे सिद्ध झाला आहे. राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपाच्या बाजून हा इव्हीएम घोटाळा झाला आहे, असा आरोप दत्त यांनी यावेळी केला.