बुलडाणा : राज्यात विजेची वारंवार निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता, अक्षय ऊर्जा स्रोताचा वीज निर्मितीसाठी वापर, हे राज्यासाठी वरदान ठरले आहे, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्थापित करण्यात आलेल्या अक्षय ऊर्जा निर्मिती संचयनीद्वारे २0१६-१७ या वर्षामध्ये मध्ये ६ हजार ९७८ मेगावॉट वीज निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती राज्य शासनाच्या २0१६-१७ या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे.पवन, सौर, जैविक, बायोगॅस, सागरी लाटा, भू-औष्णिक आदी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अक्षय उज्रेचे स्रोत आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेस ऊर्जा संवर्धन कायदा २00१ च्या तरतुदीचे समन्वयन, विनियमन व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केले आहे. अक्षय ऊर्जा प्रसार व विकास आणि ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी यासाठी महाऊर्जा सक्रिय आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर अक्षय ऊर्जा स्रोतांमधून १0 टक्के वीज खरेदीचे उद्दिष्ट गाठण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मितीसाठी धोरणे व प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेनुसार अक्षय ऊर्जा प्रकल्पात राज्यात यावर्षी ६ हजार ९७८ मेगावॉट क्षमतेची वीज निर्मिती होत आहे.
अक्षय ऊर्जा ठरतेय वरदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 02:30 IST