घरावरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या तार काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:32 IST2021-08-29T04:32:58+5:302021-08-29T04:32:58+5:30

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथील दलित वस्ती वार्ड क्रमांक पाच येथील घरावरून जाणाऱ्या उच्च दाबाचा विद्युत ...

Remove the high pressure wires passing through the house | घरावरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या तार काढा

घरावरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या तार काढा

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथील दलित वस्ती वार्ड क्रमांक पाच येथील घरावरून जाणाऱ्या उच्च दाबाचा विद्युत पुरवठा काढण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे़

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालय देऊळगाव मही येथे मा. कनिष्ठ. अभियंता यांना २६ ऑगस्ट २०१६ याविषयी निवेदन दिले हाेते़ त्यानंतर स्वाभिमानीने आंदाेलन केल्याने महावितरण अधिकाऱ्याने लेखी स्वरूपात लिहून देऊन तारा काढण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ या आश्वासनांची अजूनही पूूर्तता झालेली नाही़ त्यामुळे ३० ऑगस्ट राेजी राेहित्राच्या डीपीवर बसून आंदाेलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अंबादास बुरकुल यांनी दिला आहे़ याविषयीचे निवेदन कनिष्ठ अभियंता महावितरण, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आले आहे. यावेळी अंबादास बुरकुल, गणेश शिंगणे, वसंता पाटील, शेख जुल्फेकार, मधुकर शिंगणे, राहुल कदम, रामेश्वर देशमुख, तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Remove the high pressure wires passing through the house