वसुली बाकी असताना काढले २0 लाखांचे देयक!

By Admin | Updated: December 6, 2015 02:37 IST2015-12-06T02:37:04+5:302015-12-06T02:37:04+5:30

पुरवठा कार्यालयाचा उफराटा कारभार.

Remaining 20 lakhs of remittances while recovering! | वसुली बाकी असताना काढले २0 लाखांचे देयक!

वसुली बाकी असताना काढले २0 लाखांचे देयक!

बुलडाणा: महागाई निर्देशांकाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून ४८ लाख ४१ हजार रुपयांचा लाभ घेणार्‍या हमाल संस्थांकडून सुमारे ३ लाख रुपये वसुली बाकी असताना येथील जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन यांनी याच हमाल संस्थांचे २0 लाख रुपयांचे नियमबाह्य देयक अदा केल्याचे निष्पन्न झाले. यावर कासिम शेख यांनी जिल्हधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. जिल्ह्यातील शासकीय अन्नधान्य गोदामावर हमालीचे काम ८ हमाल कामगार संस्थांना देण्यात आले होते. यापैकी ७ संस्थांनी २00८ ते २0११ या तीन वर्षांसाठी अ (तांत्रिक) प्रमाणे करारनामा न करता ब (व्यापारी दर) प्रमाणे निविदा प्रक्रियेत भाग घेऊन कामाचा दर निश्‍चित करून हामालीचा करारनामा केला. तत्कालीन पुरवठा अधिकारी टाकसाळे व हमाल संस्थांनी शासनाची दिशाभूल करून महागाई निर्देशांकाच्या नावाखाली शासनाकडून ४८ लाख ४१ हजार ८८९ रुपयांचा अवैधरीत्या लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली होती. ही माहिती देऊळघाट येथील कासिम शेख यांनी माहितीच्या अधिकाराखाली काढली. त्यामुळे पुरवठा विभागात सुरू असलेली अनियमितता चव्हाट्यावर आली होती.

Web Title: Remaining 20 lakhs of remittances while recovering!