शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

बुलडाणा जिल्हय़ात प्रजासत्ताकदिनी ‘ई-नाम’साठी होणार शेतकर्‍यांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:22 AM

चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीव्दारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या ग्रामसभांमध्ये ई-नाम  (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकर्‍यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे.                    

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात चिखली बाजार समितीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीव्दारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या ग्रामसभांमध्ये ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकर्‍यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे.                    शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपारीक पद्धती बंद करून संगणकीकृत आणि ऑनलाइन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली असून, त्यासाठी ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) चे एक व्यापार पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. याद्वारे देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आलेले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचा या योजनेत समावेश करण्यात आला असून यानुषंगाने ३0 लाख रूपयांचा निधी देखील मंजूर झालेला आहे. त्यानुसार बाजार समितीत आवकाची नोंद संगणकावर केली जात आहे. समित्यांमधील लिलाव, शेतीमालाची शेतकर्‍यांना दिली जाणारी पट्टी यामध्ये पारदर्शकता निर्माण झाली आहे. तसेच सर्व लिलाव, शेतमालाची नोंदणी, पट्टी खात्यावर जमा करणे आदी बाबी ई-व्यवहारांद्वारे सुरू झाल्या असून राष्ट्रीय स्तरावरील ई-बाजारामुळे जास्तीत जास्त व्यापारी या लिलावात सहभागी होणार असून यामुळे स्पर्धा निर्माण होवून शेतकर्‍यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे. तथापी शेतमालाच्या विक्रीनंतर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट पैसे त्याच दिवशी जमा करण्यासाठी ई-पेमेंटची सुविधा देखील याअंतर्गत आहे. दरम्यान तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून शेतकरी बाजार समितीमध्ये येत असल्याने व त्यांना या योजनेचे फायदे माहीत होणे आवश्यक असल्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या ग्रामसभांमध्ये त्याविषयी माहिती व मार्गदर्शन केले जाणार असून शेतकर्‍यांची नोंदणी सुध्दा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने शेतकर्‍यांनी आधार, बँक खाते क्रमांक आदी माहितीसह २६ जानेवारी रोजी ग्रामसभांना उपस्थित रहावे व या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समिती सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, सचिव अजय मिरकड यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीMarketबाजार