वीज वितरण कंपनीत कर्मचार्‍यांची कमी; कामाचा खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:21 IST2017-10-25T00:20:27+5:302017-10-25T00:21:00+5:30

मेहकर : मेहकर उपविभाग वीज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत.

Reduction of employees in power distribution company; Work! | वीज वितरण कंपनीत कर्मचार्‍यांची कमी; कामाचा खोळंबा!

वीज वितरण कंपनीत कर्मचार्‍यांची कमी; कामाचा खोळंबा!

ठळक मुद्दे१४३ गावांचा कारभार केवळ ४९ कर्मचार्‍यांवर एक वर्षापासून शाखा अभियंताच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर उपविभाग वीज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा वाढत आहे. मेहकर तालुक्यात येणार्‍या जवळपास १४३ गावांचा कारभार केवळ ४९ कर्मचार्‍यांवर चालतो. कर्मचारी कमी असल्याने समस्या वाढत असून, इतर कर्मचार्‍यांवर कामाचा ताणतणाव वाढत आहे.
सध्या दैनंदिन जीवनामध्ये इतर जीवनावश्यक वस्तुबरोबर वीज ही आवश्यक बाब होऊन बसली आहे. घरगुती कामापासून ते व्यवसाय, शेती इतर कामासाठी वीज ही आवश्यक होऊन बसली आहे. शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची कामे वेळेवर होत नसल्याने याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. कृषी पंपाची वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनी कार्यालय मेहकर अंतर्गत जवळपास ९३ पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ ४९ कर्मचारीच कार्यरत आहेत. ४४ कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा वाढत आहेत. 
काम जास्त अन् कर्मचारी कमी. त्यामुळे शेतकर्‍यांची व सर्वसामान्यांची विजेची कामे वेळेवर होत नाहीत. जनतेमध्ये वीज कंपनी विरोधात रोष निर्माण होताना दिसत असला तरी पण वरिष्ठ पातळीवरून रिक्त जागा भरण्यास विलंब होत असल्याने विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. कर्मचारी कमी असूनही इतर जे कार्यरत कर्मचारी आहेत, ते कर्मचारी आपल्या परीने वीज समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेहकर भाग १ मध्ये ११ जागा मंजूर असून, ५ कर्मचारी कार्यरत आहेत. ६ कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. मेहकर भाग - २ मध्ये १३ जागा मंजूर असून, ९ कर्मचारी कार्यरत आहेत, तर ४ जागा रिक्त आहेत. मेहकर ग्रामीण भाग १ मध्ये १३ जागा मंजूर असून, ११ कार्यरत तर २ जागा रिक्त आहेत. मेहकर ग्रामीण भाग २ मध्ये ११ जागा मंजूर असून, ४ कर्मचारी कार्यरत आहेत. ७ जागा रिक्त आहेत. डोणगाव भाग १ मध्ये १४ जागा मंजूर असून, ७ कर्मचारी कार्यरत असून, ७ जागा रिक्त आहेत. डोणगाव भाग २ मध्ये १२ जागा मंजूर असून, ७ कर्मचारी कार्यरत आहेत. ५ जागा रिक्त आहेत. जानेफळ येथे १६ जागा मंजूर असून, ६ कर्मचारी कार्यरत तर १0 जागा रिक्त आहेत. यामध्ये जवळपास ९0 जागा मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र केवळ ४९ कर्मचारी कार्यरत आहेत. ४१ कर्मचारी सध्या रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा वाढत असून, विजेच्या समस्या सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरुन समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.   

एक वर्षापासून शाखा अभियंताच नाही
मेहकर येथील वीज कंपनी कार्यालयामध्ये गेल्या १ वर्षापासून २ शाखा अभियंत्याची पदे रिक्त आहेत. तर अकाऊंट असिस्टंटची १ जागा गेल्या ३ वर्षापासून रिक्त आहे. या रिक्त जागांमुळे कार्यालयातील कामाचा खोळंबा होत आहे. 

Web Title: Reduction of employees in power distribution company; Work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.