उत्कर्ष फाउंडेशनच्या कनिष्ठ महाविद्यालयात मान्यता; प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:29+5:302021-07-12T04:22:29+5:30
परिसरातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जालना, औरंगाबाद येथे जावे लागत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात ...

उत्कर्ष फाउंडेशनच्या कनिष्ठ महाविद्यालयात मान्यता; प्रवेश सुरू
परिसरातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जालना, औरंगाबाद येथे जावे लागत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी उत्कर्ष फाउंडेशनअंतर्गत येथे उत्कर्ष वरिष्ठ महाविद्यालय सुरू करून या भागातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे दालन खुले करून दिले. कॉलेजच्या एकाच कॅम्पसमध्ये तिन्ही शाखांची पदवी देणारी या भागातील ही एकमेव संस्था असल्याने विद्यार्थ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. आता संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाला मान्यता मिळाली असून सर्व शाखांच्या ११ वी व १२ वीच्या वर्गांना प्रवेश सुरू झाले आहेत. अकरावी वर्गाला प्रवेश घेतल्यानंतर पदवी घेऊन विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडतील़ त्यामुळे विद्यार्थ्यांना ही मोठी संधी असून याही पुढे जाऊन उच्च शिक्षणात संस्था कायम अग्रेसर असणार असल्याचा विश्वास प्राचार्य सुनील सुरुले यांनी व्यक्त केला. (वा़ प्र.)