अमडापूर येथे महिलेवर बलात्कार
By Admin | Updated: June 3, 2017 00:24 IST2017-06-03T00:24:40+5:302017-06-03T00:24:40+5:30
अमडापूर : येथील एका २३ वर्षीय विवाहितेवर जबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत २३ वर्षीय विवाहित महिलेने १ जून रोजी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

अमडापूर येथे महिलेवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : येथील एका २३ वर्षीय विवाहितेवर जबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत २३ वर्षीय विवाहित महिलेने १ जून रोजी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, ३० मे रोजी दुपारी १२ वाजेला आरोपी प्रताप कौसे याने तिला देवेंद्र इंगळे यांच्या घरामध्ये नेले तेव्हा आरोपी श्याम रामचंद्र जुमळे रा.अमडापूर हा याच घरामध्ये हजर होता. दरम्यान, श्याम जुमडे याने सदर महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून श्याम रामचंद्र जुमडे व प्रताप कौसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.