दिव्यांग मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 11:08 AM2020-11-16T11:08:49+5:302020-11-16T11:09:05+5:30

Buldhana Crime News बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Rape on a crippled girl; Accused arrested | दिव्यांग मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

दिव्यांग मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : ऐन दिवाळीच्या दिवशी संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. एका नराधमाने दिव्यांग मुलीवर दिवाळीच्या दिवशी दुपारी १ वाजता दरम्यान  लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार काकनवाडा खुर्द येथील आरोपी सोपान गजानन रसाळे (वय ३४) याने एका २१ वर्षीय जन्मतः बोलता येत नसलेल्या दिव्यांग मुलीला शाैचालयात नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. घटनेच्या वेळी मुलगी व तिची आई नळावरून पाणी भरत होती. दोघींनी पाण्याच्या दोन खेपा घरी आणल्यावर एक भांडे रिकामे होते. ते भांडे भरून आणण्यास आईने मुलीला सांगितले. ती पाणी आणण्यासाठी गेली. 
मात्र बराच वेळ उलटूनही घरी परतली नाही. त्यामुळे तिला बघण्यासाठी आई  गेली असता नळावर दिसून आली नाही. मात्र, जवळच एका घरासमोरील प्रसाधन गृहात तिच्या रडण्याचा आवाज येत होता. त्या आवाजावरून तेथे पाहिले असता आरोपी सोपान रसाळे बळजबरीने अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. आईने आरडाओरडा करीत आरोपीला चोप दिला व त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तेथून पळ काढला. घटनास्थळावरून घरी परतल्यावर आईने थेट तामगाव पोलिस स्टेशन गाठले. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी सोपान रसाळे याच्यावर बलातत्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करम्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे  करीत आहेत.

Web Title: Rape on a crippled girl; Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.