रणरागिणींनी केली बाटली आडवी

By Admin | Updated: August 21, 2014 23:28 IST2014-08-21T23:28:49+5:302014-08-21T23:28:49+5:30

देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी गावातील मतदानाचा हक्क बजावता येणार्‍या महिला मतदारांचे २१ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले.

Ranaragini stole the bottle | रणरागिणींनी केली बाटली आडवी

रणरागिणींनी केली बाटली आडवी

मोताळा : तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी गावातील मतदानाचा हक्क बजावता येणार्‍या महिला मतदारांचे २१ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी गावातील ६१९ मतदारांपैकी ४0६ महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून, त्याची टक्केवारी ६३ एवढी आहे. दारू दुकानाच्या विरोधात आडव्या बाटलीच्या चिन्हावर ३७५ मते पडल्याने महिलांनी ही लढाई जिंकली आहे. दारू दुकानाविरोधात नारीशक्ती एकवटल्याचे जिल्हय़ातील पहिलेच उदाहरण आहे. गावातील दारू दुकानामुळे होणार्‍या त्रासाला कंटाळून महिलांनी दुकान हटविण्यासाठी पुढाकार घेतला. अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या मार्गदर्शनात येथील महिलांनी सनदशीर मार्गाने पुढाकार घेत या दुकानासमोरच केलेल्या मद्य प्राशन निषेध आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेतली. १२ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करून ठराव घेण्यात आला. यावेळीसुद्धा तब्ब्ल ३७२ महिलांनी दारूचे दुकान हटविण्यासाठी विरोधात मतदान करून ठराव संमत केला. सदर ठराव पारित झाल्यानंतर आज मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी तहसीलदार रमेश पवार, उत्पादन शुल्क प्रभारी निरीक्षक एस. वाय. ङ्म्रीनिवास प्रेमलता सोनोने, प्रकाश सोनोने, जिजाऊ महिला मंडळाचे सहकार्य मिळाले.

Web Title: Ranaragini stole the bottle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.