राज मल्लावत याने सनदी लेखापालच्या परीक्षेत मिळविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST2021-09-21T04:38:03+5:302021-09-21T04:38:03+5:30

देऊळगाव राजा येथील रहिवासी नगर परिषदेचे माजी नगरसेवक दीपक मल्लावत यांच्या मुलाने दहावीनंतर सनदी लेखापाल होण्यासाठी तयारी अकोला येथे ...

Raj Mallawat succeeds in the examination of Chartered Accountant | राज मल्लावत याने सनदी लेखापालच्या परीक्षेत मिळविले यश

राज मल्लावत याने सनदी लेखापालच्या परीक्षेत मिळविले यश

देऊळगाव राजा येथील रहिवासी नगर परिषदेचे माजी नगरसेवक दीपक मल्लावत यांच्या मुलाने दहावीनंतर सनदी लेखापाल होण्यासाठी तयारी अकोला येथे तयारी केली. २०१६ मध्ये फाउंडेशनच्या परीक्षेत २०० पैकी १७८ गुण मिळून प्रथम पायरी यशस्वीरीत्या पूर्ण केली तर २०१८ मध्ये सीए इंटरच्या परीक्षेत ७०० पैकी ४७० गुण घेऊन भारतात ४१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. दुसरी पायरीसुद्धा घवघवीत यश घेऊन यशस्वी झाला तर सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत ८०० पैकी ५०७ गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. भारतातून सीएच्या अंतिम परीक्षेअंतर्गत ग्रुप एकची परीक्षा ४९ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी दिली असून, त्यातील ९ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ग्रुप दोनची परीक्षा एकूण ४२ हजार २०३ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील ७ हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Raj Mallawat succeeds in the examination of Chartered Accountant