पावसाळ्यात अंत्ययात्रा काढावी लागते ट्रॅक्टर ट्रालीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:15+5:302021-09-25T04:37:15+5:30

अकोला ठाकरे हे गाव मेहकर तालुक्यातील असून, येथील स्मशानभूमी गावापासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर गायरानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. ...

In the rainy season the funeral has to be taken out in a tractor trolley | पावसाळ्यात अंत्ययात्रा काढावी लागते ट्रॅक्टर ट्रालीमध्ये

पावसाळ्यात अंत्ययात्रा काढावी लागते ट्रॅक्टर ट्रालीमध्ये

अकोला ठाकरे हे गाव मेहकर तालुक्यातील असून, येथील स्मशानभूमी गावापासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर गायरानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. मात्र, त्याचा रस्ता हा नाल्यामधून जातो. एखाद्या व्यक्तीचा पावसाळ्यात मृत्यू होणे म्हणजे संपूर्ण गावासमोर यक्ष प्रश्न उभा राहतो की, मृताला अंत्यविधीसाठी न्यायचे कसे? यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था करून नंतर अंत्यविधीची तयारी करावी लागते. गाव स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे कित्येक वेळा मागणी केली. मात्र, अद्यापपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले नाही.

यांची अंत्ययात्रा काढली ट्रॅक्टरमधून

अकोला ठाकरे येथील रामचंद्र गणपत खोलगाडे (६५) यांचा मृत्यू २२ सप्टेंबर रोजी झाला. तेव्हा अंतविधीसाठी न्यायचे तर रस्त्यात चिखल व नाल्यात पाणी. शेवटी गावकऱ्यांनी ट्राॅलीमध्ये अंत्ययात्रा काढली. गावकरी चिखल तुडवीत स्मशानभूमीत पोहोचले.

स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता करण्यासाठी अनेक वेळा मागणी केली आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष न दिल्याने अकोला ठाकरेवासीयासांठी ही समस्या उद्भवली आहे.

-विष्णू ठाकरे, माजी सरपंच, अकोला ठाकरे

Web Title: In the rainy season the funeral has to be taken out in a tractor trolley