महिन्यानंतर पाऊस बरसला

By Admin | Updated: August 21, 2014 23:25 IST2014-08-21T23:25:50+5:302014-08-21T23:25:50+5:30

दुष्काळाच्या सावटात आशादायी चित्र : माना टाकलेल्या पिकांना मिळाली संजीवनी

Rain after the month | महिन्यानंतर पाऊस बरसला

महिन्यानंतर पाऊस बरसला

बुलडाणा : गेल्या २३ जुलै रोजी जिल्हाभरात बर्‍यापैकी पाऊस झाल्यानंतर पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. आज महिन्याभरानंतर जिल्ह्यातील चिखली, मेहकर, मोताळा, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव, खामगाव तालुक्यातील आज दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली असून, नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. काल १९ ऑगस्ट रोजी चिखली, मोताळा, जळगाव जामोद, लोणार, सिंदखेडराजा तालुक्यातील ४४ मिमी पाऊस पडला. इतर तालुक्यामध्ये मात्र पावसाचा आकडा निरंकच होता. आज या तालुक्यासोबतच खामगाव, बुलडाणा, मोताळा परिसरातही पाऊस आला. १ जून ३१ ऑक्टोबर दरम्यान ७१२.६७ सरासरी एवढा पाऊस अपेक्षित असतो; मात्र वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के एवढाच पाऊस बुलडाणा जिल्ह्यात झाला असून, तब्बल १0 तालुके टंचाईमध्ये घोषित करण्यात आले आहेत. गेल्या २३ जुलैनंतर पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली. दररोज येणार्‍या ढगाळ वातावरणामुळे पावसाचा लपंडाव सुरु होता, तो आज संपला.

Web Title: Rain after the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.