वरली-मटक्यावर छापा; तिघांना अटक
By Admin | Updated: August 28, 2014 23:53 IST2014-08-28T23:45:18+5:302014-08-28T23:53:56+5:30
मंगरूळ नवघरे येथे वरली-मटका अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड; तिघांना अटक.

वरली-मटक्यावर छापा; तिघांना अटक
अमडापूर : मंगरूळ नवघरे येथे सुरू असलेल्या वरली-मटका अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ रोजी छापा मारून तिघांना अटक केली तर एक जण फरार झाला. सपोनि निलेश लोधी, जी.आर. जाधव, एएसआय शेषराव अंभोरे यांच्यासह पथकाने मंगरूळ नवघरे येथे सुरू असलेल्या वरली-मटका अड्डय़ावर छापा मारला असता, प्रल्हाद सीताराम डोके, अनिल श्रीराम पवार रा. मंगरूळ नवघरे, रमेश नाथा वाकोडे रा.वरखेड यांना रंगेहात पकडून त्यांना अटक केली; तसेच त्यांच्याजवळील नगदी ३ हजार ८४0 रू. व दोन मोबाईल, मटका साहित्य असा एकूण पाच हजार रुपयांचा माल जप्त केला. तर एक जण फरार झाला.