फटाके फाेडणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर चालवले राेड राेलर; ६० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई
By संदीप वानखेडे | Updated: June 20, 2023 17:11 IST2023-06-20T17:11:22+5:302023-06-20T17:11:32+5:30
बुलढाणा : शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फाेडणारे सायलेन्सर बसवण्याची क्रेझ वाढत आहे़ फटाके फाेडणाऱ्या सायलेन्सरमुळे नागरिकांना कर्णकर्कश ...

फटाके फाेडणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर चालवले राेड राेलर; ६० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई
बुलढाणा : शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फाेडणारे सायलेन्सर बसवण्याची क्रेझ वाढत आहे़ फटाके फाेडणाऱ्या सायलेन्सरमुळे नागरिकांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास हाेताे़ शिवाय प्रदूषणही माेठ्या प्रमाणात वाढल्याने बुलढाणा शहर पाेलिसांनी अशा बुलेटचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे तसेच २० जून राेजी २४ सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावरून राेड राेलर चालवण्यात आले़
बुलढाणा शहरासह जिल्ह्यात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फाेडणारे सायलेन्सर बसवण्यात येत आहेत. त्यामुळे कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास हाेताे़ शिवाय प्रदूषणातही वाढ हाेते़ त्यामुळे वाहतूक पाेलीस, बुलढाणा शहर पाेलिसांच्या वतीने अशा बुलेटचालकांवर कारवाई करण्यासाठी माेहीम राबवण्यात आली़ यामध्ये साठ दुचाकीचालकांवर सहा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच फटाके फोडणारे सायलेन्सर २० जून राेजी पोलिसांनी काढून घेत ते रोड रोलरखाली चेपून नष्ट करण्यात आले़ यापुढेदेखील आरटीओ नियमाप्रमाणे वाहने चालवावीत, सायलेन्सरमध्ये कोणी बदल केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.