जुगार अड्डय़ावर छापा; ५८ हजाराचे साहित्य जप्त

By Admin | Updated: July 2, 2014 00:36 IST2014-07-01T23:20:46+5:302014-07-02T00:36:03+5:30

नदी पात्रात सुरू असलेल्या जुगाराच्या खेळावर छापा घालून ४ जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला.

Raid on gambling stand; 58 thousand literature seized | जुगार अड्डय़ावर छापा; ५८ हजाराचे साहित्य जप्त

जुगार अड्डय़ावर छापा; ५८ हजाराचे साहित्य जप्त

मोताळा : रोहिणखेड शिवारामधील नदी पात्रात सुरू असलेल्या जुगाराच्या खेळावर छापा घालून ४ जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला. ही कारवाई सोमवारी संध्याकाळी करण्यात आली.
रोहिणखेड येथे सार्वजनिक ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये एक्का बादशाह जुगार खेळतांना व खेळवितांनाची गुप्त माहिती मिळाल्यावरून ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव बढे पोलिसांनी छापा घातला. तेव्हां आरोपींची एकच धावपळ उडाली. आरोपींपैकी शे.मुक्तार शे.सत्तार हा पळून गेला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये भिकनशाह याकुबशाह, लतिपशाह भिकनशाह, महंमद ऐलान महंमद लुकमान व रशिदखाँ इमामखाँ यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोंपीजवळून नगदी ४४१0 रूपये, चार मोबाईल किंमत ४ हजार रूपये, मोटारसायकल किंमत ५0 हजार रूपये असा एकूण ५८ हजार चारशे रूपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे.

Web Title: Raid on gambling stand; 58 thousand literature seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.