खा. राहुल गांधी यांनी घेतले श्रींचे दर्शन

By अनिल गवई | Updated: November 18, 2022 17:39 IST2022-11-18T17:38:10+5:302022-11-18T17:39:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शेगांव: काँग्रेसच्या भारत जोदो यात्रेदरम्यान विदर्भ दौऱ्यावर असलेल्या खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी साडेचार वाजता श्रींचे ...

Rahul Gandhi took darshan of Shri gajanan Maharaj | खा. राहुल गांधी यांनी घेतले श्रींचे दर्शन

खा. राहुल गांधी यांनी घेतले श्रींचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगांव: काँग्रेसच्या भारत जोदो यात्रेदरम्यान विदर्भ दौऱ्यावर असलेल्या खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी साडेचार वाजता श्रींचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची उपस्थिती होती.

 खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी सकाळी शेगाव येथे आगमन झाले. बाळापूर ते वरखेड फाट्यापर्यन्त पायी प्रवास केल्यानंतर खा. गांधी यांनी वरखेड फाट्यावर काही वेळ विश्राम केला. त्यानंतर खा. राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेते वाहनाने दुपारी विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज मंदिरात  पोहोचले. यावेळी श्री गजानन महाराज संस्थानकडून व्यवस्थापकीय विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी खा. गांधी यांचा यथोचित सत्कार केला. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर  राहुल गांधी यांची जाहीर सभेच्या ठिकाणी रवाना झाले.

Web Title: Rahul Gandhi took darshan of Shri gajanan Maharaj