शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 2:54 PM

पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत.

योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रब्बीचा हंगाम अर्धा संपला तरी जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना अद्याप सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात पाऊस झाल्याने खरिपाची पीके हातातून गेली. जिल्ह्यात खडकपूर्णा, नळगंगा, मन, पेनटाकळी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, गोराळा असे सिंचन प्रकल्प प्रामुख्याने आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. असे असतानाही सिंचन विभागातर्फे कोणतेही नियोजन यावर्षी करण्यात न आल्याने शेतकºयांना रब्बीसाठी पाणी मिळाले नसल्याची दुर्दैव आहे. राजकारणात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना याचे सोयरसुतक उरले नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हयातील बहुतांश प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पाणीही आरक्षीत आहे. मात्र पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कालव्याची दुरुस्ती अद्याप होवू न शकल्याने पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे.पाणी वापर संस्थांचे कुणी ऐकेना!शेतकºयांना सिंचनासाठी जास्तीत जास्त नियोजनबद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी वापर संस्था कार्यान्वीत करण्यात आल्या. मात्र पाणी वापर संस्थांचाही आवाज प्रशासनाकडून दाबण्यात आल्याचे दिसून येते. कुणी काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेतकºयांच्या रोषाचा सामना पाणी वापर संस्थांना करावा लागत आहे.१५ डिसेंबरच्या आश्वासनाचे काय झाले?मागणीनुसार १५ डिसेंबरपर्यंत सिंचन प्रकल्पातून कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले होते. मात्र ५ जानेवारी आली तरी अद्याप पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकºयांची गरज लक्षात घेवून पाणीही आरक्षीत करण्यात आले. मात्र काही ठिकाणी शेतकºयांनी पाट फोडून ठेवले आहेत. त्यात कालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे थोडा उशिर झाला.- अनिल कन्ना अभियंता, जलसंपदा विभाग, बुलडाणा

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प