शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी भर उन्हात लागली रांग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

चिखली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता लसीकरणाचे महत्त्वदेखील नागरिकांना कळले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, ...

चिखली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता लसीकरणाचे महत्त्वदेखील नागरिकांना कळले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, लसीकरणाच्या ठिकाणी योग्य नियोजन नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात उभे राहावे लागत होते. ही बाब निदर्शनास येताच चिखली अर्बन बँकेने पुढाकार घेत लसीकरण केंद्रावर मंडप उभारल्याने या मायेच्या सावलीमुळे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यावर आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. सुरुवातील या लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद होता. मात्र, आता लसीचे महत्त्व कळल्याने, तसेच ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाली असल्याने लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. पर्यायाने लसींचा तुटवडादेखील जाणवत आहे. मात्र, सद्य:स्थितीत लसींचा साठा उपलब्ध असल्याने शहरातील लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांची लांबपर्यंत रांग लागत आहे. भर दुपारी कडक उन्हात नागरिकांना लसीसाठी नंबर लावावा लागत असल्याने उष्माघात होण्याचा धोका वाढला होता. ही बाब निदर्शनास येताच दि चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीष गुप्त यांनी तातडीने लसीकरण केंद्रावर मंडप टाकून सावलीची व्यवस्था केल्याने लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन सतीष गुप्त यांनी केले आहे.

लसीकरणाची व्याप्ती वाढविणे गरजेचे !

लसीकरणाच्या कामाला शहरात मोठा वेग आला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाबाबत पाळावयाच्या नियमांचा देखील फज्जा उडतो. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्यासह मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करणे गरजेचे आहे.

मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहभाग आवश्यक !

यापूर्वी शहरातील काही प्रभागात स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देत वार्डातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता चिखली अर्बननेदेखील लसीकरणाच्या या मोहिमेत कृतिशील सहभाग नोंदवून नागरिकांची हेळसांड होऊ नये याची काळजी घेतली आहे. याच धर्तीवर इतर संस्था व लोकप्रतिनिधींचा पुढाकार घेतल्यास लसीकरणाची मोहीम यशस्वी होण्यास फारसा वेळ लागणार नाही.