चांडोळ कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या जागेचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:05+5:302021-04-03T04:31:05+5:30

चांडोळ येथे कृषि उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरु व्हावा, यासाठी अनेक दिवसांपासुन सकारात्मक हालचाली सुरु होत्या. त्यासाठी जागेची मुख्य ...

The question of the place of Chandol Agricultural Produce Sub-Market Committee has been resolved | चांडोळ कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या जागेचा प्रश्न सुटला

चांडोळ कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या जागेचा प्रश्न सुटला

चांडोळ येथे कृषि उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरु व्हावा, यासाठी अनेक दिवसांपासुन सकारात्मक हालचाली सुरु होत्या. त्यासाठी जागेची मुख्य अडचण होती. याबाबत प्रशासकीय स्तरावर आणि सरकार स्तरावर बाजार समितीचे मुख्य प्रशासक जालिंधर बुधवत यांनी खा. प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून हा प्रश्न लावून धरला होता. दरम्यान, वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, चांडोळ येथील गट नंबर ६५९ मधील वर्गाची दोन हेक्टर आर. अर्थात पाच एकर शासकीय जमीन उपबाजाराच्या प्रयोजनासाठी महसूल व वन विभागाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीने चांडोळ येथे उपबाजार सुरु केल्यास याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होऊन, आपसूकच उत्पन्न देखील वाढेल. हा हेतू समोर ठेवून जालिंधर बुधवत यांनी प्रयत्न्न केले. यात जागा ही बाब मुख्य अडसर होती. राज्य सरकारने जागा मंजूर केल्याने हा अडसर दूर झाला आहे.

चांडोळ येथील उपबाजार सुरू होऊन शेतकऱ्यांना हक्काचे दालन मिळणार आहे. खाजगी लुटीचे प्रकार आणि फसवणूक टाळण्यासाठी उपबाजार चांडोळ परिसरातील शेतकरी बांधवासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी संचालक मंडळ व आताचे प्रशासकीय सदस्य यांचे पाठबळ आपल्याला लाभत असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण करु.

जालिंधर बुधवत, बाजार समितीचे मुख्य प्रशासक.

Web Title: The question of the place of Chandol Agricultural Produce Sub-Market Committee has been resolved