विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:36+5:302021-05-10T04:34:36+5:30
आजपर्यंत साडेतीन लाखांवर निगेटिव्ह अहवाल बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाणही अधिक ...

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचा प्रश्न
आजपर्यंत साडेतीन लाखांवर निगेटिव्ह अहवाल
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. आजपर्यंत तीन लाख ८३ हजार २८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी
बुलडाणा : राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. मात्र, आता कोरोनामुळे ही परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने सध्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यात येत आहे.
होमगार्ड अडचणीत
बुलडाणा : पोलीस जवानांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या होमगार्डना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ऑन ड्युटी होमगार्ड उपाशी अशी अवस्था झाली आहे.
मेहकर तालुक्यात १२० पॉझिटिव्ह
मेहकर : तालुक्यात शनिवारी १२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे, तर काही रुग्ण हे खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती झाले आहेत.