अर्धवट बांधकाम झालेल्या नाट्यगृहात बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:27 IST2018-02-13T15:25:04+5:302018-02-13T15:27:53+5:30

बुलडाणा :लक्ष वेधण्यासाठी १२ व्या बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे या अधर्वट नाट्यगृहात रविवारी प्रकाशन करण्यात आले.

Publication of the emblem of Buldhana District Sahitya Sammelan | अर्धवट बांधकाम झालेल्या नाट्यगृहात बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

अर्धवट बांधकाम झालेल्या नाट्यगृहात बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

ठळक मुद्देनाट्यगृहाची इमारत पूर्णत्वास यावी आणि कलारसिकांसाठी हे भव्य सांस्कृतिक नाट्यगृह उपलब्ध व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणाच्या वतीने येत्या २४ फेब्रुवारी रोजी येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात १२ वे बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.पुढील वर्षीपर्यंत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होऊन याठिकाणी साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

बुलडाणा : निधीअभावी रखडलेली एकता नगरातील नाट्यगृहाची इमारत पूर्णत्वास यावी आणि कलारसिकांसाठी हे भव्य सांस्कृतिक नाट्यगृह उपलब्ध व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १२ व्या बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे या अधर्वट नाट्यगृहात रविवारी प्रकाशन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वºहाडे यांनी बोधचिन्हाचे प्रकाशन केले. नाट्यगृहाची इमारत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय कार्यवाहीला वेग देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला. विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणाच्या वतीने येत्या २४ फेब्रुवारी रोजी येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात १२ वे बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आकर्षक बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी संमेलन संयोजक नरेंद्र लांजेवार, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, विसासंचे कोषाध्यक्ष अनिल अंजनकर, शंकर कºहाडे, आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिषचंद्र रोठे, अभिनेता अ‍ॅड. गणेश देशमुख, नाट्यकलावंत अमोल कुळकर्णी, सुरज वाडेकर, प्रा. संतोष आंबेकर, प्रा. हरीष साखरे, पंजाबराव गायकवाड, सुवणा पावडे कुळकर्णी, वैशाली तायडे, अनिल रिंढे, रमेश आराख, रविंद्र साळवे, रविकिरण वानखेडे, सर्जेराव चव्हाण, प्रतिक शेजोळ, पंजाबराव आखाडे, पराग काचकुरे, पत्रकार रणजीतसिंग राजपूत, सुधीर देशमुख, बाबासाहेब जाधव, पुरुषोत्तम बोर्डे इत्यादी साहित्य-सांस्कृतिक तथा नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पुढील वर्षीपर्यंत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होऊन याठिकाणी साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी प्रशासनाकडून व्यक्त केली.

Web Title: Publication of the emblem of Buldhana District Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.