‘लोटा’बंदीसाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:29 IST2017-08-03T23:28:33+5:302017-08-03T23:29:47+5:30

बुलडाणा : बुलडाणा नगरपालिकेने दोन हजार वैयक्तिक शौचालयांचा टप्पा पूर्ण केला असून, आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत आहे. यासाठी शहरात  हगणदरीमुक्त अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. उघड्यावर शौचालयास जाणार्‍यांची पोलीस ठाण्यात वरात काढण्यात येत आहे, तर ‘लोटा’बंदीसाठी विविध प्रसार माध्यमांद्वारे  जनजागृती करण्यात येत आहे.

Public awareness for 'lota' ban | ‘लोटा’बंदीसाठी जनजागृती

‘लोटा’बंदीसाठी जनजागृती

ठळक मुद्देदोन वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण उघड्यावर जाणार्‍यांची ठाण्यात वरात!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा नगरपालिकेने दोन हजार वैयक्तिक शौचालयांचा टप्पा पूर्ण केला असून, आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत आहे. यासाठी शहरात  हगणदरीमुक्त अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. उघड्यावर शौचालयास जाणार्‍यांची पोलीस ठाण्यात वरात काढण्यात येत आहे, तर ‘लोटा’बंदीसाठी विविध प्रसार माध्यमांद्वारे  जनजागृती करण्यात येत आहे.
शहरातील जोहरनगर, भिलवाडा, तेलगूनगर, जमाईनगर, टीव्ही रिले सेंटर परिसर जुनागाव, भीमनगर, आंबेडकरनगर, परदेसीपुरा, संभाजीनगर आदी विस्तीर्ण पट्टय़ात गल्लीबोळात वैयक्तिक शौचालयांचे खड्डेकाम, निर्माणाधिन शौचालय, बांधकाम साहित्यांचे ढीग, मिस्त्री, मजूर व घरमालकांची लगबग, पालिका कर्मचार्‍यांची देखरेख, पालिकेत पूर्ण शौचालयांचे फोटो काढून अपलोड करण्याची व अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येत आहे, तर  दुसरीकडे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ५.३0 वाजेपासून ते रात्री ८.३0 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग पथक ‘संवेदनशील’ भागात गस्त घालत आहे.  सकाळी ५.३0 ते ८.३0 वाजता ‘गुड मॉर्निंग’ करून कर्मचारी १0 च्या ठोक्याला कार्यालयात व नंतर पुन्हा ५ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत या मोहिमेत सहभागी होत आहेत.  फिरत्या पथकांसह दोन जणांची ‘त्या’ परिसरात दोन-दोन तासांची निगराणी राहत आहे. वारंवार उघड्यावर सापडणार्‍या नागरिकांची थेट पोलीस ठाण्यात ‘वरात’ आणण्यात येऊन तंबी देण्यात येते. शौचालय नसणार्‍यांना घरकुल, बीपीएल यादी, रेशनकार्ड यामधून वगळण्याचा सज्जड इशारा देण्यात येतो. 
या पार्श्‍वभूमीवर आज अखेरीस शहरात ३२00 लक्ष्यांकाच्या तुलनेत दोन हजारांवर वैयक्तिक शौचालये  बांधून पूर्ण झाली असून, त्याचे फोटो अपलोड करण्यात आले. उर्वरित एक हजार शौचालये एका आठवड्यात पुर्ण होतील, अशी चिन्हे आहेत. याच जोडीला सार्वजनिक शौचालयांवरही भर देण्यात आला आहे. यापूर्वीची १0 सार्वजनिक शौचालये दुरुस्त व सुरु करण्यात आली. तसेच टाटा ग्राउंड, जुना गाव, जमाईपुरा, नवीन घरकुल परिसर, सावित्रीबाई, मिलिंदनगर, एच.पी.गॅस गोडावून, संगम तलाव, जौहर नगर, लेंडी तलाव, संभाजीनगर या परिसरात सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली. या सर्व कारवाईमुळे शहरात ‘हगणदरीमुक्त’चे वातावरण तयार झाले आहे.

Web Title: Public awareness for 'lota' ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.