विद्यार्थ्यांनी केली ‘स्वच्छता हीच सेवा’ बाबत जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:00 IST2017-10-10T18:59:18+5:302017-10-10T19:00:12+5:30

देऊळगाव कुंडपाळ : स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि शौचालय बांधकाम व वापर करण्यासाठी नानाविध संदेश देत स्थानिक मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून स्वच्छता हीच सेवा, उपक्रमाची जनजागृती करुन गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला.

Public awareness about 'Cleanliness Hech Service' by students! | विद्यार्थ्यांनी केली ‘स्वच्छता हीच सेवा’ बाबत जनजागृती!

विद्यार्थ्यांनी केली ‘स्वच्छता हीच सेवा’ बाबत जनजागृती!

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरीगाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव कुंडपाळ : स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि शौचालय बांधकाम व वापर करण्यासाठी नानाविध संदेश देत स्थानिक मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून स्वच्छता हीच सेवा, उपक्रमाची जनजागृती करुन गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला.
प्रारंभी शाळेत महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजनाने अभिवादन करुन प्रभात फेरीस प्रारंभ झाला. दरम्यान विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांंचे स्वच्छतेवरचे कीर्तन, सासरी शौचालय नसलेल्या नवविवाहितेची अवस्था पथनाट्यातून सादर केली. तर गुटखा, दारु, तंबाखू सोडा नाहीतर व्यसनाधिनांना राक्षस खाऊन टाकील, असा एकपात्री प्रयोगही फेरी दरम्यान दाखविण्यात आला. प्रभातफेरीची संपूर्ण गावातील प्रमुख रस्त्यावरुन अखेर शाळेत सांगता करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रा.देविदास चव्हाण, उत्तमराव इंगळे, केशव सरकटे, लक्ष्मण सरकटे, रामभाऊ नरवाडे, भारत राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच स्वाती नरवाडे, उपसरपंच संतोष सरकटे, बबनराव सरकटे, मुख्याध्यापक गो.मा.पवार, केंद्रप्रमुख मापारी, ग्रामसेवक शिंगणे, माजी सरपंच कुसूमताई सरकटे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सभेतच ३ युवकांनी दारु गुटखा सोडण्याचे वचन उपस्थितांना दिले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन बाजड यांनी केले. 
अन् चिमुकलीने सोडायला भाग पाडली पित्याची दारु
स्वच्छता हिच सेवा व महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने निघालेल्या प्रभात फेरीच्या सांगता सभेत कु.पल्लवी विजय इंगळे या १० वर्षीय बालीकेने आपल्या मनोगतातून आपल्या वडीलाने दारु सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मुलीच्या या भावस्पर्शी आवाहनाला प्रतिसाद देत विजय जाधव यांनी सभेतून उठून माईक हातात घेऊन माझ्या मुलीने मला ज्ञान शिकवले. मी आजपासून दारु पिणार नाही, असे उपस्थितांना वचन दिले.यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
-

Web Title: Public awareness about 'Cleanliness Hech Service' by students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.