वन समित्यांना प्रोत्साहन
By Admin | Updated: May 30, 2014 00:37 IST2014-05-30T00:34:40+5:302014-05-30T00:37:55+5:30
हिरवळीचे क्षेत्र वाढविण्यासाठी वन विभागाची विशेष योजना.

वन समित्यांना प्रोत्साहन
अनिल गवई/ खामगाव
हिरवळीचे क्षेत्र वाढविण्यासाठी वन विभागाची एकच धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. हिरवळीच्या क्षेत्रात वाढ करणार्या वन समित्यांना गॅस सिलिंडर, दुधाळ जनावरे आदी साहित्य देण्याची विशेष योजना राबविली जात आहे. चराई आणि कुर्हाडबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी वन विभागाची धडपड सुरू आहे. विशेष योजनेच्या माध्यमातून हिरवळ जोपासणार्या वन समित्यांना वन विभाग प्रोत्साहन देत आहे. या प्रोत्साहनाचा सकारात्मक परिणाम वन क्षेत्र असलेल्या सर्वच भागांमध्ये दिसून येत आहे. बुलडाणा जिल्हय़ातील मांडणी येथील वन संरक्षण संयुक्त वन समितीने तब्बल तीनशेपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर हिरवळ वाढविली आहे. आता इतर वन समित्यांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वन क्षेत्र परिसरातील विविध गावांमध्ये टप्याटप्याने हिरवळ वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. हिरवळ जोपासण्यासोबतच वन जमिनीचा र्हास होणार नाही, याची विशेष खबरदारीही घेतली जाणार आहे. हा उपक्रम वन विभागाच्या वतीने सर्वत्र राबविल्या जात आहे.