खडसेंच्या प्रकृतीत बिघाड

By Admin | Updated: October 2, 2014 00:22 IST2014-10-02T00:22:59+5:302014-10-02T00:22:59+5:30

देऊळगावराजा, नांदुरा येथील प्रचारसभा रद्द करून मुंबईकडे प्रस्थान.

Problems with rashes | खडसेंच्या प्रकृतीत बिघाड

खडसेंच्या प्रकृतीत बिघाड

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात प्रचार दौर्‍यावर आलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याने, त्यांनी जिल्ह्यातील देऊळगावराजा, नांदुरा येथील प्रचारसभा रद्द करून, मुंबईकडे प्रस्थान केले.
बुलडाणा येथे पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपचे जेष्ठ नेते अँड. व्ही. डी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची मनधरणी करण्यासाठी खडसे बुधवारी बुलडाण्यात आले; मात्र अचानक पोटाचा त्रास सुरू झाल्याने, त्यांनी अँड. पाटील यांच्या निवासस्थानी विङ्म्रांती घेतली. स्थानिक डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर दुपारी ३.१५ वाजता ते हेलीकॉप्टरने थेट मुंबईकडे रवाना झाले.

Web Title: Problems with rashes