शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

मनुष्यबळाअभावी कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:39 IST

Buldhana news मुख्य कालवे, अंतर्गत पाट, सऱ्यांच्या देखभालीसह निरीक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असताना ५७ कर्मचाऱ्यांवर हा डोलारा उभा आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे, सहा मध्यम व ८१ लघू प्रकल्प आहेत.४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारीच कार्यरत आहेत.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली असता पाटबंधारे विभागाच्या सिंचन शाखेंतर्गत तब्बल ५६ टक्के पदे रिक्त असल्याने सिंचन सुविधांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासोबतच कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्थापित सिंचन क्षमता महत्तम पातळीवर उपयोगात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे, सहा मध्यम व ८१ लघू प्रकल्प आहेत. याप्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचनासाठी प्राधान्य दिले जाते; मात्र यासाठी या विभागाकडे आवश्यक असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याच कमी असल्याने समस्या निर्माण होत आहे. जेथे ४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारीच कार्यरत आहेत तर ७५३ किमी लांबीच्या मुख्य कालवे, अंतर्गत पाट, सऱ्यांच्या देखभालीसह निरीक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असताना ५७ कर्मचाऱ्यांवर हा डोलारा उभा आहे. वास्तविक टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी दिले जाते. त्यानुषंगाने प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली, कालवा चौकीदार या पदांची आवश्यकता आहे; मात्र ही पदेच रिक्त असल्याने समस्या आहेत. त्यामुळे यंदा पाण्याची उपलब्धता असूनही प्रत्यक्ष सिंचनासाठी त्याचा कितपत उपयोग होतो, असा प्रश्न आहे. पेनटाकळी प्रकल्पावरील कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला.

प्रकल्प हस्तांतरणाबाबतही अडचणपेनटाकाळी प्रकल्पाचा कालवा फुटल्यानंतर या प्रकल्पाच्या हस्तांतरणासंदर्भातही बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागामध्ये काही अडचणी असल्याचे समोर येत आहे. २००१ आणि २००८ च्या परिपत्रकाचा संदर्भ त्यास आहे. पेनटाकळी प्रकल्पही अद्याप निर्माणाधीन आहे. त्याची एक सुप्रमाही सध्या प्रलंबित आहे. तसेच प्रकल्पातून अद्याप महत्तमस्तरावर  सिंचन सुरू झालेले  नाही. १०० हेक्टर सिंचन निर्मिती अद्यापही बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकल्पावरून महत्तमस्तरावर १४,३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होऊ शकते. सध्या ती १४,२३२ हेक्टरपर्यंत निर्माण झाली आहे.

पाच शाखांमध्ये पदभरती नाहीपेनटाकळी संदर्भाने उपविभागांतर्गत पाच शाखा कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र त्या ठिकाणी आवश्यक असलेली पदभरती झालेली नाही. दप्तर कारकून, मोजणीदार, शिपाई, कालवा चौकीदार, कालवा निरीक्षकांसह अन्य अशी जवळपास ११० पदे येथे रिक्त आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या मेहकर तालुक्यातील ही स्थिती असेल तर अन्य तालुक्यांचा विचार न केलेला बरा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प