खासगी शिक्षण संस्थांनी पालकांची अडवणूक करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:23+5:302021-07-12T04:22:23+5:30
मेहकर : गत दोन वर्षांपासून काेराेनामुळे सर्वसामान्य पालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. काेराेनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याने अनेक बालकांचे छत्र ...

खासगी शिक्षण संस्थांनी पालकांची अडवणूक करू नये
मेहकर : गत दोन वर्षांपासून काेराेनामुळे सर्वसामान्य पालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. काेराेनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याने अनेक बालकांचे छत्र हरवले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांची खासगी शिक्षण संस्थांनी अडवणूक करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डाॅ.ज्ञानेश्वर टाले यांनी केली आहे. पालकांना वेठीस धरल्यास आंदाेलन करण्याचा इशारा टाले यांनी दिला आहे.
गत वर्षापासून काेराेना संक्रमण वाढल्याने, सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांचा राेजगार गेला आहे. व्यवसाय बंद पडले आहेत. अनेक पालकांसमोर सध्या मोठे आर्थिक संकट उभे असून, फीसाठी काही शिक्षण संस्था व शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन हे पालकांची अडवणूक करत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना शुल्क नियमन कायद्यांतर्गत विभागीय शुल्क नियमन समितीकडे पाठपुरावा करणार आहे. अनेक खासगी शाळा व्यवस्थापनाच्या वतीने ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून फार मोठ्या प्रमाणात फी वसूल केल्या जात आहे. याला शिक्षण विभागाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पायबंद घालावे व तसे अधिकृत परिपत्रक काढून संबंधित सर्व शाळा व्यवस्थापनाला सूचना द्याव्यात, यासाठीही शिक्षण विभागाकडे, शिक्षणमंत्री व शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे, अन्यथा पालकांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी दिला आहे.
110721\1433-img-20210711-wa0044.jpg
डा.टाले