शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजना आता आॅनलाइन!

By admin | Updated: July 14, 2017 00:48 IST

प्रस्ताव आॅनलाइन सादर करता येणार!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना आता शेतकऱ्यांना सुलभ व सोप्या पद्धतीने विमा काढता यावा, याकरिता आॅनलाइन करण्यात आली आहे. या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येते. या योजनेचे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना सुलभता मिळणे व गावपातळीवर पूरक नोंदणी सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीपासून योजनेचे प्रस्ताव आॅनलाइन स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज व विमा हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. याकरिता राज्यात सीएससीई गव्हर्नस सर्व्हिसेस इंडिया लि. द्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.यावर्षीपासून योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव तयार करतेवेळी आधार कार्ड व फोटो असलेल्या खातेपुस्तकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक केले आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधार कार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी एक फोटो ओळखपत्र सादर करावे. कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक जोडण्याकरिता त्वरित बँकेशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावा लागणार आहे.योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर ७० टक्के, असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याची अंतिम तारिख ३१ जुलैपर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. आतापर्यंत पीक विम्याची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या घरात मिळाली आहे.