शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:05 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांत जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांत जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. डास अळी सर्व्हेक्षण करुन जनजागृती केली जाणार आहे. सर्व्हेक्षणासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक पथकात दोन जणांचा समावेश राहील. इतर विभागांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी. चव्हाण यांनी दिली.जून ते आॅक्टोंबर हा किटकजन्य रोगांसाठी पारेषण कालावधी असतो. या काळात सर्वच किटकजन्य रोगांचा प्रसार होत असतो. डेंग्यू सारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी डेंग्यू रुग्णांमध्ये तुलनात्मक वाढ दिसून आली होती. डेंग्यू आजारावर प्रभावी व निश्चित औषधोपचार नाही.डेंग्यू नियंत्रणासाठी ताप सर्व्हेक्षण, किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण, कोरडा दिवस पाळणे, नागरिकांना शिक्षण देणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हा एकमेव पर्याय आहे. शहरी भागांमध्ये डेंग्यू रुग्णांचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यू संवेदनशिल शहरात जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जुलैमध्ये २२ ते २७, आॅगस्टमध्ये १९ ते २४ तर सप्टेंबरमध्ये १६ ते २१ दरम्यान सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.डेंग्यू संवेदनशिल शहरांमध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, मलकापूरचा समावेश आहे. बुलडाणा येथे २२ , चिखली २१, मेहकर १८, खामगाव २९, शेगाव २७ व मलकापुरात ३० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन हे कर्मचारी नागरिकांना डेंग्यूबाबत जनजागृती करणार आहेत. आरोग्य सेवक, नगर पालिका कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविकांच्या मदतीने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.डेंग्यू प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवावी, घर व परिसरात डोसोत्पत्तीस्थाने असल्यास नष्ट करावी, आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरातील सर्व पाणी साठे कोरडे करुन ठेवावे. पाणी साठे घट्ट झाकून ठेवावे, उन्हाळ्यात वापरलेले कुलर स्वच्छ करुन कोरडे करावे, भंगार सामान, तुटलेली खेळणी, टायर्स, फुटलेल्या बादल्या, जुनी माठ, राजणे नष्ट करावी, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, लहान मुलांना अंगभर कपडे घाला, खिडक्यांना डासरोधक जाळी बसवा, परिसरातील डबकी बुजवावी, किंवा गप्पी मासे सोडावी, ताप आल्यास त्वरित वैद्यकिय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू