संसदेच्या सामान्य प्रयोजन समितीवर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 17:28 IST2019-12-01T17:27:55+5:302019-12-01T17:28:33+5:30

आता संसदीय सामान्य प्रयोजन हेतु समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

Prataprao Jadhav on General Purpose Committee of Parliament | संसदेच्या सामान्य प्रयोजन समितीवर जाधव

संसदेच्या सामान्य प्रयोजन समितीवर जाधव

बुलडाणा : खासदार प्रतापराव जाधव यांची संसदेच्या सामान्य प्रयोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या कामकाजा संदर्भातील बाबींच्या सर्वसामान्य हेतूने ही समिती कार्यरत असते. त्यानुषंगाने महत्त्वाच्या अशा या समितीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी खा. जाधव यांची केंद्रीय ग्रामविकास समितीच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन महत्त्वाच्या समितीवर खा. जाधव यांना नियुक्ती देण्यात आली. तिसऱ्यांदा निवडून आलेले खा. प्रतापराव जाधव यांच्या कामाची दघर घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या जहाज बांधणी सल्लागार समितीवरही त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता संसदीय सामान्य प्रयोजन हेतु समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

Web Title: Prataprao Jadhav on General Purpose Committee of Parliament