शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजनांची थकित वीज देयके टंचाई निधीतून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:18 IST

जिल्ह्यातील एक हजार १९५ नळ योजनांची ही वीज देयके महावितरणला अदा करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दुष्काळी गावातील पाणीपुरवठा योजनांची वीज देयके टंचाई अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून भरणा करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील एक हजार १९५ नळ योजनांची ही वीज देयके महावितरणला अदा करण्यात आली आहे. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्याला दोन कोटी ४८ लाख १६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.त्यापैकी एक कोटी ७५ लाख ५९ हजार ९९२ रुपये नळ योजनांच्या थकीत देयकापोटी महावितरणकडे भरणा करण्यात आल्याने नळ योजनांद्वारे टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यास आता अडचण राहलेली नाही. दुष्काळ घोषित झालेल्या क्षेत्रातील नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्याच्या कालावधीत ग्रामीण तथा नागरी भागातील चालू वीज देयके टंचाई अंतर्गत प्राप्त निधीतून भरणा करण्याबाबत  पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अनुषंगीक अंमलबजावणी केली आहे. नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंतची देयके अदा करण्यात आली आहे. प्रती ग्रामपंचायत किमान १८० रुपये ते जवळपास १२ हजार रुपयापर्र्यंत प्रतिमाह  एक हजार १९५ नळ योजनांची वीज देयके येतात. ही देयके ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून महावितरणला ती अदा करण्यात येऊन संबंधित ग्रामपंचायतींना त्याची कल्पना देण्यात येते. दरम्यान या योजनेतंर्गत दुष्काळी गावातील थकीत वीज देयकाअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना थकित देयकाच्या मुद्दला्या रकमेपैकी पाच टक्के इतकी रक्कम भरून योजनांचा पाणीपुरवठा ही या अंतर्गत पूर्ववत करता येतो. मात्र थकित वीज देयका अभावी एकही योजना जिल्ह्यात बंद नव्हती.जून २०१९  पर्यंतची नळ योजनांची देयके टंचाई निधीतून भरणा करण्यासाठी आता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनाकडे अनुमती मागितील आहे.  ती मिळाल्यास जून पर्यंतची देयके अखर्चित निधूतून भरण्यात येणार आहेत, तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.प्राप्त निधी बँकेत पडून राहणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना असून प्रसंगी तसा प्रकार झाल्यास तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सुचना आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरणwater scarcityपाणी टंचाई