आडगावराजात वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:16+5:302021-07-18T04:25:16+5:30
आडगावराजा गावातील राेहित्र जळून पाच दिवस झाले आहे. महावितरणकडून या गावांमध्ये नवीन राेहित्र बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन ...

आडगावराजात वीजपुरवठा खंडित
आडगावराजा गावातील राेहित्र जळून पाच दिवस झाले आहे. महावितरणकडून या गावांमध्ये नवीन राेहित्र बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. गावातील नागरिकांना रात्र-रात्र भर लाइट बंद असल्यामुळे जागरण करावे लागत आहे. गावातील वृद्ध तसेच लहान मुलांनासुद्धा उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावांमधील विद्युत तारा या जीर्ण झालेल्या असून त्या केव्हाही तुटतात. या जीर्ण झालेल्या तारांसाठी अनेक वेळा निवेदने देऊनही त्यावर अद्यापही कोणत्याच प्रकारे कार्यवाही करण्यात आलेली नाही. पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी गावातली लाईट रात्रभर गायब असते. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़