विद्युत ग्राहकांची महावितरण कार्यालयावर धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:46 IST2017-11-07T00:46:05+5:302017-11-07T00:46:22+5:30
मेहकर : वीज सुरु करण्याबाबत मागणी करूनही काहीच उपयोग न झाल्याने नगरपालिकेचे आरोग्य सभापती मनोज जाधव यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर रोजी शेकडो विद्युत ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन वीज अधिकार्यांना तत्काळ वीज सुरु करण्याची मागणी केली.

विद्युत ग्राहकांची महावितरण कार्यालयावर धडक!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर शहरातील मिलिंद नगर, कैकाडी गल्ली, इंदिरा नगर, परिसरात गेल्या चार दिवसांपासून अंधार आहे. वीज कर्मचार्यांकडे वेळेवर वीज सुरु करण्याबाबत मागणी करूनही काहीच उपयोग न झाल्याने नगरपालिकेचे आरोग्य सभापती मनोज जाधव यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर रोजी शेकडो विद्युत ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन वीज अधिकार्यांना आपल्या समस्या सांगितल्या व तत्काळ वीज सुरु करण्याची मागणी केली.
स्थानिक मिलिंद नगर, कैकाडी गल्ली, इंदिरा नगर परिसर आदी भागासाठी विद्युत पुरवठा करणारे रोहित्र जळाल्याने या भागातील नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून वीज पुरवठा सुरू करणे गरजेचे होते. मात्र वीज पुरवठा सुरु करण्यात आला नाही, त्यामुळे या भागातील नागरिक गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहेत, तसेच या भागातील विद्युत रोहित्र नेहमी उघडेच राहते, त्यामुळे परिसरात खेळणार्या बालकाच्या व नागरिकांच्या जीवि त्वास धोक ा निर्माण झाला आहे. रोहित्रामधून ऑइल गळणे, स् पार्कींग होणे, फ्यूज जाणे, आदी प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. नगरपालिकेचे आरोग्य सभापती मनोज जाधव यांच्या नेतृत्वात नागरिक वीज कं पनी कार्यालयावर धडकले. यावेळी वीज अधिकारी प्रशांत कलोरे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या असता , त्यांनी त त्काळ विद्युत पुरवठा सुरु करून विद्युत पुरवठय़ासंबंधित येणार्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी न.पा. आरोग्य सभापती मनोज जाधव, विजय माने, सीताराम माने, अरुण माने, सुरेश बनचरे अण्णा असलकर, श्रीराम कळंबे, संजय जाधव, रवि जाधव, जंगलु जाधव, संजय माने, हरीश बनचरे, अंकुश ब्राम्हणे, राहुल माने, संतोष माने, अजय जाधव,पवन गोडवे, दी पक माने, स्वप्नील जाधव, नरेश बनचरे हजर होते.