रस्ता सौंदर्यीकरणाच्या कामामुळे रहदारीस अडथळ्याची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:35 AM2021-04-24T04:35:34+5:302021-04-24T04:35:34+5:30

या अनुषंगाने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार जयस्तंभ चौक ते जिल्हा सहकारी बँक चौकापर्यंतच्या रस्ता ...

Possibility of obstruction of traffic due to road beautification work! | रस्ता सौंदर्यीकरणाच्या कामामुळे रहदारीस अडथळ्याची शक्यता !

रस्ता सौंदर्यीकरणाच्या कामामुळे रहदारीस अडथळ्याची शक्यता !

Next

या अनुषंगाने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार जयस्तंभ चौक ते जिल्हा सहकारी बँक चौकापर्यंतच्या रस्ता सौंदर्यीकरणाच्या कामांतर्गत ठिकठिकाणी सुमारे पाच बाय पाचचे काँक्रीटचे मोठे स्तंभ उभारले जात आहेत. चौकोनी आकाराचे हे स्तंभ रस्त्याच्या मधोमध उभारले जात असून, त्यांचा आकार मोठा असल्याने यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शंका व्यक्त केली आहे, तसेच हा रस्ता सर्वच ठिकाणी एकसारखा नसून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, बसस्थानक या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात येणारे हे चौकोनी आकाराचे मोठे स्तंभ रहदारीस अडथळा निर्माण करण्यासह वादास कारणीभूत ठरणारे असल्याने या ठिकाणचे स्तंभ इतरत्र ठिकाणी हलविण्यात यावेत व इतर ठिकाणीदेखील रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देताना शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे रवींद्र तोडेकर, शेखर बोंद्रे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, संतोष लोखंडे, प्रमोद चिंचोले, सदानंद मोरगंजे, प्रशांत डोंगरदिवे, शे. अनिस शे. अशपाक आदींची उपस्थिती होती.

Web Title: Possibility of obstruction of traffic due to road beautification work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.