मोताळा तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता

By Admin | Updated: June 4, 2014 23:49 IST2014-06-04T23:45:24+5:302014-06-04T23:49:48+5:30

मोताळा तालुक्यात ५0 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन.

The possibility of growing soybean sown in Motala taluka | मोताळा तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता

मोताळा तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता

मोताळा : तालुक्यातील शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. यावर्षी तालुक्यात ५0 हजार २00 हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता असून सुमारे ७३0७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याची माहीती कृषी खात्याकडून मिळाली आहे. कोरडवाहू शेतकर्‍यांची सारी दरोमदार ही पावसावरच अवलंबून असल्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकरी आपले नियोजन करतो. मान्सूनची सुरूवात लवकरच होणार असल्याच्या आशेवर तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतीम टप्प्यात आहे. तालुक्यातील १५ ते २0 टक्के शेतकरी हा सिंचणाच्या भरवश्यावर (मागील वर्ष वगळता) कापसाची लागवड करत आला आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाने येथील शे तकर्‍याला हवालदील केल्यामुळे शेतकरीवर्गाचा पावसावर विश्‍वास राहिला नाही. परिणामी गेल्या काही वर्षापासून कापसाचे विक्रमी उत्पादन घेणारा तालुक्यात मागील दोनवर्षापासून कापसाचा पेरा कमी-कमी होत आहे. मागील वर्षी ३२0९७ हेक्टरवर कापसाचा पेरा होता. यावर्षी १00७४ हेक्टरवर पेरा कमी होवून २२0२३ हेक्टरवर कापसाचा पेरा प्रस्तावित आहे. सोयाबीनचा पेरा मात्र वाढलेला असून मागील वर्षीच्या तुलनेत ७३0७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयानुसार तालुक्यात ५0 हजार २00 हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचे नियोजन केल्या गेले आहे. यामध्ये कापूस २२0२३ हेक्टर, सोयाबीन ११६८२ हेक्टर तर जवारी,उडीद, मुंग, भूईमुंग, तीळ, बाजरी,तूर या कडधान्य िपकासाठी १६४९५ हेक्टर क्षेत्र प्रस्तवित आहे.

Web Title: The possibility of growing soybean sown in Motala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.