दुसरबीड ते मलकापूर पांगरा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:23+5:302021-09-26T04:37:23+5:30

दुसरबीड : दुसरबीड ते मलकापूर पांगरा रस्त्याची गत काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे़ रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहन ...

Poor condition of Dusarbeed to Malkapur Pangra road | दुसरबीड ते मलकापूर पांगरा रस्त्याची दुरवस्था

दुसरबीड ते मलकापूर पांगरा रस्त्याची दुरवस्था

दुसरबीड : दुसरबीड ते मलकापूर पांगरा रस्त्याची गत काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे़ रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत़ खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात घडत आहेत़ याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़

दुसरबीड परिसरातील लाेकांना खामगाव तसेच शेगावला जाण्यासाठी मलकापूर पांगरा मार्गे जात असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे़ याच रस्त्याने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे़ रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त जड वाहने भरधाव वेगाने जाताना दिसतात़ क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर मोठमोठे जीव घेणे खड्डे पडले आहेत़

कंत्राटदाराची दुरुस्तीसाठी टाळाटाळ

समृद्धी महामार्गाच्या जड वाहनांमुळे या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे, कंत्राटदार कंपनीने या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे़ मात्र, संबंधित कंत्राटदार रस्ता दुरुस्तीसाठी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे़ या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़

Web Title: Poor condition of Dusarbeed to Malkapur Pangra road