‘होळी’चा बेरंग करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:49 IST2020-03-09T14:49:50+5:302020-03-09T14:49:50+5:30
दारू पिऊन वाहन चालविणाºयांविरोधात कारवाईसाठी शहर पोलिसांनी मोहिम उघडली आहे.

‘होळी’चा बेरंग करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:होळी आणि धुळवडीला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाºयांवर पोलिसांची करडी नजर असून, सोमवारी दुपारपासूनच शहर पोलिसांनी अनेकांची तपासणी सुरू केली आहे.
होळी आणि धुलीवंदनाला दारू पिऊन वाहन चालविणे आणि इतर गोष्टी करण्याचे फॅड युवक आणि काही सामान्यांमध्ये दिसून येते. दारू पिऊन अथवा धांगडधिंगा करीत वाहने चालविल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होते. शिवाय अनेक निष्पापांचा नाहक जीव जातो. त्यामुळे होळी आणि धुळवडीला धांगडधिगा तसेच दारू पिऊन वाहन चालविणाºयांविरोधात कारवाईसाठी शहर पोलिसांनी मोहिम उघडली आहे.
‘ब्रिथ’ अॅनालायझरद्वारे तपासणी!
शहरातील मुख्य रस्ते आणि विविध चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याठिकाणी ‘ब्रिथ’अॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आल्यास तात्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच बंदोबस्तासाठी स्ट्रायकिंग फोर्स आणि आरसीपी पथक तैनात करण्यात आले आहे.
खबरदारी घेण्याचे आवाहन!
‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी होळी आणि धुलीवंदन साजरे करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धुलीवंदनासाठी ओल्या रंगांऐवजी कोरड्या रंगांचा वापर करण्याचेही पोलिसांनी सुचविले आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
होळी आणि धुलीवंदन हा सण करताना नागरिकांनी शांततेने आणि उत्साहात साजरा करावा. शहरातील शांततेला बांधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. दारू पिऊन वाहन चालविणाºयांविरोधात तसेच धांगडधिंगा करणाºयाविरोधात मोहिम उघडण्यात आली आहे.
- सुनील अंबुलकर
निरिक्षक
शहर पोलिस स्टेशन, खामगाव.