खामगाव येथील जुगारावर पोलिसांचा छापा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 22:53 IST2018-05-01T22:53:30+5:302018-05-01T22:53:30+5:30

बाळापूर फैल भागातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून १३ जणांना अटक केली. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Police raid on Jugaara in Khamgaon, two lakh worth of money seized | खामगाव येथील जुगारावर पोलिसांचा छापा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव येथील जुगारावर पोलिसांचा छापा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव: येथील बाळापूर फैल भागातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून १३ जणांना अटक केली. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री ८:४५ वाजता करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील बाळापूर फैल भागातील एका ठिकाणी मोठा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी छापा टाकला. यात राजेश सुरेश बुलानी(२८) रा. तलाव रोड खामगाव, निलेश अंबादास पवार(३०) रा. बाळापूर फैल, मनोज तानाजी कांबळे(२२) रा. चांदमारी, गणेश शिवाजी पाटेकर(३१) रा. चांदमारी, शे. जावेद शे. सलीम (२८) रा. माखरिया मैदान, प्रकाश घनश्याम गोहर(४९) रा. सतिफैल, लक्ष्मण सोनाजी घोगले(५०) रा. किसन नगर, अमर सुभाष बारस्कर(३०) रासतिफैल, दिनेश रमेश हेलोडे (३३) रा. पुरवार गल्ली, चेतन गिरधारी व्यास (३०) रा. फरशी, विनोद जनार्दन जाधव(३६) रा. शेलोडी, चेतन मनोहर मस्के( २४) रा. चांदमारी, सुनील हरिदास निर्मळ(४०) रा. गोपाळ नगर हे जुगार खेळताना मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी सर्व १३ जणांना अटक केली.

यावेळी १० मोबाईल, ४ मोटारसायकल , नगदी असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे जुगा-यांचे धाबे दणाणले आहे. ही धाडशी कारवाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रवींद्र लांडे, रवींद्र वानखेडे, शे. नवाज, सुरज राठोड, शांताराम खाळपे, दीपक राठोड, शैलेश राजपूत यांनी केली.

Web Title: Police raid on Jugaara in Khamgaon, two lakh worth of money seized