जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:58+5:302020-12-30T04:43:58+5:30

देऊळगाव राजा: सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा तथा देऊळगाव राजा पोलिसांनी ...

Police raid gambling den | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

देऊळगाव राजा: सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा तथा देऊळगाव राजा पोलिसांनी धाड टाकून १२ जणांवर कारवाई केली, तसेच त्यांच्याकडून तीन लाख ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत सदर जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून १२ जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे कारवाई केली. या कारवाईमध्ये आरोपी विनोद गणेश मेहेत्रे, कोंडिबा रामभाऊ भोजने, रा. सिंदखेड राजा, गुलाम नबी शेख नजीर रा. जालना, सय्यद मोसिन सय्यद कट्टू रा. सिंदखेड राजा, दिलीप गणपत ढोबळे रा. सावखेड भोई, सय्यद युसूफ सय्यद उस्मान रा. देऊळगाव राजा, सिद्धांत आनंदराव खांडेभराड रा. देउळगाव राजा यांच्यासह अधिक सात आरोपीवर कायदेशीर कारवाई केली आहे. यातील पाच लोक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमध्ये नगदी एक लाख १७ हजार पाचशे रुपये ७ मोबाइल, सहा मोटरसायकल असा एकूण ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत अधिक तपास देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संभाजी पाटील व श्रीकृष्ण गवई करीत आहेत.

Web Title: Police raid gambling den