विनयभंग प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

By Admin | Updated: August 11, 2015 23:57 IST2015-08-11T23:57:11+5:302015-08-11T23:57:11+5:30

मातोळा तालुक्यातील राजूर येथील विनयभंग प्रकरण.

Police detained in connection with the molestation case | विनयभंग प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

विनयभंग प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील राजूर येथील १४ वर्षीय कुमारिकेच्या विनयभंग प्रकरणातील चार आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बोराखेड पोलीस स्टेशन अंतर्गत राजूर येथील एका १४ वर्षीय कुमारिकेच्या विनयभंगप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ९ ऑगस्ट रोजी राजूर येथील शेख साबीर शेख नजीर, सै. जुबेरसह अधिक १५ ते २0 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात १0 ऑगस्ट रोजी आरीफखाँ लालखाँ (वय ३0), शेख जावेद शेख शौकत (वय २८), सय्यद शोएब सय्यद शमुमोद्यीन (वय २0), शेख मतीन शेख दाऊद (वय २२) या चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती. पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी आर. टी. शेवाळे यांनी दिली.

Web Title: Police detained in connection with the molestation case