खापरखेड-सोमठाणा रस्त्याची दुर्दशा

By Admin | Updated: September 11, 2014 00:27 IST2014-09-11T00:27:59+5:302014-09-11T00:27:59+5:30

लोणार तालुक्यातील खापरखेड-सोमठाणा रस्ता दुरूस्तीची मागणी.

Plight of Khapkhed-Somthana road | खापरखेड-सोमठाणा रस्त्याची दुर्दशा

खापरखेड-सोमठाणा रस्त्याची दुर्दशा

खापरखेड : लोणार तालुक्यातील खापरखेड-सोमठाणा फाट्या पासून ते सोमठाणा गावातपर्यंत ३ की.मी. अंतर असून या रस् त्याच्या मध्यभागी व रस्त्याच्या कडेला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याकडे सार्वजनिक विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. या दोन्ही गावातील नागरिक व विद्यार्थी आणि वाहन चालकांना या रस्त्यावरुन काट्याची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी सरपंच यांनी पत्र देवून सुद्धा या रस्त्याची कामे निकाली लावले नाही. संबंधीत विभागाने या रस्त्याचे काम त्वरीत न करुन दिल्यास दोन्ही गावा तील नागरिक येणार्‍या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Plight of Khapkhed-Somthana road