शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

‘प्लाझमोडियम’, ‘एडीस’चे प्रमाण घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:12 IST

गत आठवड्यामध्ये ११ ते १२ अंश सेल्सीयस पर्यंत तापमान घसरल्यामुळे डासांच्या जीवनचक्रात बदल झाला आहे. हवामान बदलामुळे डासांची उत्पत्ती घटली आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वाढत्या थंडीमुळे ‘प्लाझमोडियम’ व ‘एडीस’ चे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारख्या किटकजन्य आजाराचे प्रमाणही आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. गत आठवड्यामध्ये ११ ते १२ अंश सेल्सीयस पर्यंत तापमान घसरल्यामुळे डासांच्या जीवनचक्रात बदल झाला आहे. हवामान बदलामुळे डासांची उत्पत्ती घटली आहे.गेल्या काही वर्षापासून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. जेंव्हा डासाचे प्रमाण जास्त असते, तेंव्हा किटकजन्य आजरांचाही प्रादुर्भाव वाढतो. जुलै ते डिसेंबर या काळात डासांचा उपद्रव दिसून येतो. साधारणता: १५ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान आल्यास डांसाचे जीवनचक्रात बाधा निर्माण होते. या वाढत्या थंडीचा परिणाम थेट डासांच्या उत्पत्तीवर दिसून येतो. गेल्या दोन आठवड्यापासून हवामानात बदल झालेला आहे. थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘प्लाझमोडीय’, ‘एडीस’ जातीच्या डासाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे किटकजन्य आजार नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या सूक्ष्मपजीवीमुळे हा रोग होतो. मलेरियासोबतच हत्ती रोग, चिकनगुणीया, स्क्रब टायफस व इतर किटकजन्य आजार नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येतात. परंतू सध्या डासांचे जीवनचक्र बिघडल्याने किटकजन्य आजार अटोक्यात येत आहेत.महिन्याला दोन ते तीन डेंग्यू रुग्णएडिस इजिप्ती जातीच्या डासामार्फत होणारा डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.महिन्याला दोन ते तीन डेंग्यू रुग्ण आढळून येतात. जिल्ह्यात गतवर्षी २५ ते ३० डेंग्यू सदृश तापेचे रुग्णांची नोंद जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडे झाली आहे. सध्या थंडीमुळे डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाणही अत्यंत कमी झालेले आहे.

मलेरिया २४, चिकनगुणीयाचे २० रुग्ण४जिल्ह्यात हळुहळू मलेरिया रुग्णांची संख्याही अटोक्यात आली आहे. २००९ मध्ये हाच आकडा ३४८ वर होता; तो आता केवळ २४ वर आला आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे हे मोठे यश आहे. गतवर्षी मलेरियाचे २४ व चिकनगुणीयाचे २० रुग्ण आढळून आले.वाढत्या थंडीमुळे डांसाची उत्पती कमी झाली आहे. त्यामुळे किटकजन्य अजारांचे प्रमाणही आता कमी झाले आहे. सध्याचे हे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरत आहे.- शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू