वणवाव्याप्त परिसरात बीजांकुरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 00:18 IST2016-08-10T00:18:07+5:302016-08-10T00:18:07+5:30
‘वन्यजीव सोयरें’च्या परिश्रमाला फळ; १५ ऑगस्ट रोजी वनात स्वातंत्र्यदिनाचे आयोजन.

वणवाव्याप्त परिसरात बीजांकुरण!
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. ९ : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे या स्वयंसेवी संस्थेने ज्ञानगंगा अभयारण्यातील वणवाव्याप्त क्षेत्रात बिजारो पण केले होते. त्यांच्या या उपक्रमाच्या परिश्रमाला फळ लागले असून जवळपास दीड किलो मिटर परिसरात बिजांकुरण झाले आहे. या बिजांकुराचे लवकरच सर्वे करून किती झाडे वाढतील याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी काही भागात उन्हाळ्यात वणवा लागतो. या वणव्या त हजारो झाडे जळून खाक होतात. त्यामुळे पावसाळ्यात ज्ञानंगगा अभयारण्य सर्वत्र हिरवेगार दिसत असताना या भागात वृक्ष जळालेले दिसतात. त्यामुळे या भागात वृक्षलागवड करण्याचा निर्णय वन्यजीव सोयरे या स्वयंसेवी संस्थेने हाती घेवून २४ जुलै रोजी वणवाव्याप्त परिक्षेत्रात जवळपास १५ किलो चिंचोकेचे बिजारोपण दीड किलो मिटर परिसरात करण्यात आले होते. सदर बिजारोपण यशस्वी झाले असून किती झाडे वाढतील याबाबत लवकरच वन्यजिव सोयरे ही संख्या सर्वे करून प्राथमिक अहवाल तयार करणार आहे. या परिसरात सध्या गवत वाढल्यामुळे सर्वे करण्यात अडचणी येत आहेत. मात्र बिजारोपण यशस्वी झाल्यामुळे वन्यजिव सोयरे या संस्थेचे संजय हाडे, गणेश ङ्म्रीवास्तव, अजय चव्हाण, अभिजीत देशमुख, नितीन व्यवहारे, दिनेश जाधव, अनिरूध्द अमीन, सुरज वाडेकर, रमेश पवार, सतीश पाटील, किशोर जाव, संतोष कंकाळ आदी पदाधिकार्यांनी आनंद व्यक्त होत आहे.