आषाढीनिमित्त एसटीच्या ११0 गाड्यांचे नियोजन

By Admin | Updated: July 22, 2015 23:46 IST2015-07-22T23:46:37+5:302015-07-22T23:46:37+5:30

भाविकांच्या संख्येनुसार बसस्थानकातून पंढरपूरसाठी गाडी उपलब्ध करून देणार.

Planning of 110 vehicles for STs at Asadhi | आषाढीनिमित्त एसटीच्या ११0 गाड्यांचे नियोजन

आषाढीनिमित्त एसटीच्या ११0 गाड्यांचे नियोजन

बुलडाणा : जिल्ह्यातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने ११0 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. उपलब्ध भक्तांच्या संख्येनुसार या गाड्या येत्या २३ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येतात. यावर्षी २७ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे भाविकांना पंढरपूरला नेण्यासाठी २३ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्यांची आवश्यकता असते. भाविकांच्या संख्येनुसार जवळच्या बसस्थानकातून पंढरपूरसाठी गाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: Planning of 110 vehicles for STs at Asadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.