हिवरा साबळे ते सोनाटी रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:31+5:302021-09-25T04:37:31+5:30

याच पृष्ठभूमीवर रत्नापूरवासीयांनी रास्तारोको आंदोलन केले होते. शाळेतील मुली, मुले व गावातील काही निवडक व्यक्ती यामध्ये सहभागी झाले होते. ...

Pits on Hiwara Sable to Sonati road | हिवरा साबळे ते सोनाटी रस्त्यावर खड्डे

हिवरा साबळे ते सोनाटी रस्त्यावर खड्डे

याच पृष्ठभूमीवर रत्नापूरवासीयांनी रास्तारोको आंदोलन केले होते. शाळेतील मुली, मुले व गावातील काही निवडक व्यक्ती यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी सुनील मोरे, मुन्ना काळे, संदीप ढोरे यांनी भेट दिली. यावेळी स्टोन क्रेशरवाल्यांनी आम्ही गिट्टी व चुरा टाकून खड्डे बुजवून रस्ता सुरळीतपणे सुरू करून देतो असे सांगून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत खड्डे बुजवून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत सुरू झाला. गावकऱ्यांनी क्रेशरवाल्यांचे आभार मानले. यावेळी ज्ञानेश्वर प्रवीण काठोळे, बंडू पाटोळे, संतोष माने, अंकुश काठोळे, पवन साळसुंदर, शैलेश मुळे, मंगेश आस्तकर, अनिल काठोळे, गजानन काठोळे, अनिल बुरखांडे, सुभाष ढोरे, प्रदीप काठोळे, तुकाराम काठोळे अन्य गावकरी उपस्थित होते.

230921\5606new doc 2021-09-23 18.59.03_1.jpg

रस्त्यावर असणारे खड्डे

Web Title: Pits on Hiwara Sable to Sonati road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.