Person who demand 1 million ramson arested at Buldhana | १० लाखांची खंडणी मागणारा गजाआड

१० लाखांची खंडणी मागणारा गजाआड

बुलडाणा : शहरातील एका व्यक्तीला १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या देऊळघाट येथील आरोपीस १७ जानेवारीला अटक करण्यात आली. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. बुलडाणा येथील विनोद मदनलाल केडीया (वय ६५) यांना त्यांच्याच गजानन टॉकीजमध्ये पूर्वी काम करणारा अमोल भोजराज देशमुख (रा. देऊळघाट) याने १२ जानेवारीला रात्री स्वत:च्या मोबाईलवरून व्हॉटस्ॲपद्वारे मॅसेज करून ९० लाख रुपये खंडणीची मागणी केली. जर खंडणी दिली नाही, तर बदनामी करण्याची धमकी विनोद केडीया यांना दिली. यासंदर्भात विनोद केडीया यांनी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना भेटून तक्रार दिली. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी १७ जानेवारीला आरोपी अमोल भोजराज देशमुख यास देऊळघाट रोडवरील लालमाती परिसरातील मुख्य रस्त्यावर सापळा रचून ५० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी अमोल देशमुख याच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक बळिराम गीते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक विजय मोरे, प्रकाश राठोड, पोलीस हेड काॅन्स्टेबल सय्यद हारुण, पोना लक्ष्मण काटक, पोलीस काॅन्स्टेबल विजय वारुळे, दीपक वायाळ, चालक सुरेश भिसे यांनी केली आहे.

Web Title: Person who demand 1 million ramson arested at Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.