सर्व बसस्थानकावर रॅपिड चाचणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:32 IST2021-04-14T04:32:05+5:302021-04-14T04:32:05+5:30

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी ...

Perform rapid tests at all bus stations | सर्व बसस्थानकावर रॅपिड चाचणी करा

सर्व बसस्थानकावर रॅपिड चाचणी करा

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावी म्हणून जे प्रवासी बसने प्रवास करतात अशा सर्वच प्रवाशांना रॅपिड चाचणी करूनच बसमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ यासाठी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर पोलिओ बूथप्रमाणे कोरोना बूथ लावून सक्तीने तपासणी करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे़

सध्या बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे दररोज माेठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत़ अशातच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसून प्रवास करतात व संपर्कात येतात़ त्यांची तपासणी बसमध्ये बसण्यापूर्वी केल्यास कोरोना रुग्णाचा शोध घेतला जाऊ शकतो़ त्यामुळे त्वरित प्रत्येक बसस्थानकावर कोरोना चाचणी बूथ लावून दररोज प्रवास करणाऱ्यांची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे़

Web Title: Perform rapid tests at all bus stations